आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनीधी - उरण 

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप 

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र या पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या समितीने आपली सामाजिक बांधिलकी जपत रायगड जिल्हा परिषद शाळा नवघर उरण येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.



 पत्रकार उत्कर्ष समिती उरणचे सदस्य श्री विशाल डाके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महिला उत्कर्ष समिती सदस्य जयश्री चव्हाण , शिवसेना शाखाप्रमुख श्री. अविनाश म्हात्रे , श्री. ज्ञानेश्वर तांडेल, उपसरपंच श्री. विश्वास तांडेल , ज्येष्ठ नागरिक श्री. मोतीराम डाके, शुभम पाटील , सौरभ घरत, मयूर डाके, शिव मयूर डाके, अंश विशाल डाके यांची उपस्थीती होती. 


कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवघरचा शिक्षकवृंद मूख्याध्यापिका सौ. उषा राजेंद्र गावड , श्री. गणेश पांडुरंग गावंड, श्री. प्रकाश परशुराम जोशी, श्री. प्रसाद तुलशीराम म्हत्रे, श्री. अनिल वसंत म्हात्रे , सौ. सरीता गौतम गोरे यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शाळेतील साधारण 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog