आवाज कोकणचा / रायगड
पनवेल कर्नाळा अभयारण्यातील निसर्ग व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या सुरक्षा भिंतीवर नजर कुणाची ?
अरूण चवरकर - पेण
महाराष्ट्र राज्यात ज्या कर्नाळा किल्ला व अभयारण्यचे नावलौकीक आहे , अनेक पक्षी प्रेमी, प्राणी प्रेमी आपले कॅमेरे घेऊन या कर्नाळा अभयारण्याच्या डोंगरात फिरायला येतात. मुंबई गोवा रस्त्यावरून जाताना सहज नजर पडली की भुरळ पडलीच पाहिजे असे ये वेड लावणारे वातावरण आणि महाराष्ट्रातून अनेक सहली व निसर्ग प्रेमी येत असतात. तसेच तेथील माकडे व वन्य प्राणी मुक्त संचार रस्त्यावर इकडून तिकडे फिरताना दिसतात .
वन्यजीवांचा अपघात होऊ नये या साठी शासनाने रस्त्याच्या दुतर्फा पत्र्याच्या भक्कम सुरक्षा भिंती तयार केल्या आहेत जेणेकरून प्राणी रस्ता बदलताना अपघात होऊ नये व याअगोदर कर्नाळ्यातुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना लुटमार केली जात होती परंतु पत्र्यांच्या भिंती मुले लुटमारीचे प्रकार थांबले होते तर कर्नाळ्यातील पत्रे चोरून कोण नेतोय कोणाच्या आशिर्वादाने मुंबई गोवा हायवे चोवीस तास चालू असताना वनरक्षक, पोलिस पेट्रोलिंग नसते का असा जनमानसात चर्चेचा विषय बनला आहे या रस्त्यावरून लोक प्रतीनीधीं जात नाही का वन्यप्राण्यांच्या जीवाला व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी जन माणसात चर्चा चालू आहे.
Comments
Post a Comment