आवाज कोकणचा / नवी मुंबई
द्रोणागिरी मंदिर परिसरात गर्दुल्यांची गर्दी द्रोणागिरी मंदिराच्या पवित्रतेला तडा
पोलीस यंत्रणा सर्वसामान्य जनतेच्या समाज्याच्या सेवेसाठी ! की कंपनीच्या सेवेसाठी ?
उरण / पूजाचव्हाण
पोलीस यंत्रणा खासगी कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली असून.उरण पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे विदारक दृश्य आता उरण परिसरात पहावयास मिळत आहे.आत्ता या गर्दुल्यानी, करंजा द्रोणागिरी मंदिर परिसरातील सभामंडपात तसेच तेथील पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला आपला अड्डाच बनविला असून काही व्यक्ती अंमली पदार्थ (गांजा) सारख्या अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी येथे येत असल्याचे आणि तेथील परिसराचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे ,याबाबत उरणमधील जागृत पत्रकारांनी अनेकवेळा ठळकपणे वृत्त प्रसिद्ध करूनही उरण मधील पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे उरणमध्ये खुलेआमपणे टपरीवर सोनू, शहा, पटेल नावाचे विक्रते चरस, गांजा, गुटखा ची विक्री करून आजच्या घडीला करोडपती झाले आहेत. समाजात विघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांची पोलीस अधिकाऱ्यांकडे उठबस असते, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही.
उरणात वेगवेगळ्या प्रकारचे नशेली पदार्थ राजरोस पणे उपलब्ध होत असल्याने उरण मधील तरुण पिढी ही पूर्णपणे नशेच्या विळख्यात अडकली आहे. याला सर्वस्वी पोलीस खातेच जबाबदार मानले जात.असून जनमानसात तश्या प्रकारची उलटसुलट चर्चा सुरु आहे. मात्र उरणच्या प्रशासकीय आस्थापने पासून ते उरण पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी असतानाही त्यातील काही मनुष्यबळ हे उरण करंजा येथील ऑफकॉन्स कंपनीच्या सुरक्षिततेसाठी तैनात आहेत. कुणाच्या आदेशावरून म्हणा किंवा सुचनेनुसार म्हणा हे आदेश गुलदस्त्यात आहेत, खाजगी कंपनीच्या सुरक्षते साठी एवढया मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण देण्याचे कारण काय? असा सवालही जनते मधून उपस्थित होत आहे. यावरून पोलीस यंत्रणा ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी, समाज्याच्या सेवेसाठी की कंपनीच्या सेवेसाठी आहे असा प्रश्नच सामान्य जनतेला पडलेला आहे.काहीही असो उरणातून या नशेली पदार्थाचे समूळ उच्चटनझाले पाहिजे आशानशेली पदार्थ विक्रीकरणाऱ्या अड्यांची चौकशी करून संबधीतांवर कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी जनतेमधून जोरधरू लागली आहे.
कोट...
गांजा अथवा तत्सम अमलीपदार्थ सेवनकरून द्रोणागिरी मंदिराच्या पवित्रतेला आणि परिसरातील शांतता व धार्मिक वातावरणाला बाधा पोहोचविण्याचा कुणी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असेल तर याकडे द्रोणागिरी मंदिर कमिटी/करंजा ग्रामस्थ मंडळ अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. यापुढे कोणीही व्यक्ती द्रोणागिरी मंदिर परिसरात धूम्रपान अथवा अंमली पदार्थांचे (गांजा) अथवा तत्सम अमलीपदार्थ सेवन करताना आढळल्यास, संबंधित व्यक्तींवर योग्यती कठोर कायदेशीर व पोलिस कारवाई करण्यात येईल.
सर्व नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी व मंदिर परिसरातील शिस्त आणि पवित्रता राखण्यास सहकार्य करावे, ही विनंती द्रोणागिरी विश्वस्थाकडून करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment