आवाज कोकणचा / नवी मुंबई
महिला उत्कर्ष समितीचा पद वाटप व वर्षासहल कार्यक्रम संपन्न....
प्रतिनिधि - उरण
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या समितीचे उपअग असलेल्या महिला उत्कर्ष समितीचा पद वाटप कार्यक्रम रिव्हर व्ह्यू रिसॉर्ट उरण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
निसर्गरम्य परिसर व नदी किनारी असलेल्या या वास्तूमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी नवी मुंबई उपाध्यक्षपदी सौ विजया निमसे यांची निवड करण्यात आली तर ऐरोली विभाग अध्यक्षपदी सौ मानसी धनावडे , उपाध्यक्षपदी डॉ. जयश्री फडतरे आणि सचिवपदी सौ संगीता साबळे
तर सदस्यपदी शशिकला अहिरे , काजल साळवे , रुपाली शिंगे, सविता कौठेकर , प्रतिक्षा माने,
अलका पाटील यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी महिला उत्कर्ष समिती प्रदेशाध्यक्ष डॉ. स्मिता पाटील व नवी मुंबई अध्यक्ष सौ सुजाता कडू यांच्या हस्ते निवड पत्र व ओळखपत्र देण्यात आले.
यावेळी डॉ. अशोक म्हात्रे यांनी महिला उत्कर्ष समितीच्या कार्याची माहिती दिली तर महिला उत्कर्ष समितीच्या तुर्भे विभाग अध्यक्ष सौ वंदना अंबवले व राणी दळवी यांनी गायन क्षेत्रातील आपले कौशल्य दाखवत गोड आवाजाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमासाठी महिला उत्कर्ष समितीच्या वरिष्ठ सदस्य मीरा जाधव , श्वेता तांडेल , मानसी मोने यांच्यासह पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील , सहसचिव ज्ञानेश्वर कोळी, सदस्य दिलीप गायकर यांच्यासह इतर सदस्य व पदाधिकारीउपस्थित होते.
Comments
Post a Comment