आवाज कोकणचा / नवी मुंबई 

करंजातील तुळजाई मासेमारी बोटीला जलसमाधी पाच खलाशी सुखरूप तीन खलाशी बेपत्ता.....


वार्ताहर / पूजा चव्हाण

उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीच्या तुळजाई नावाच्या मासेमारी करणाऱ्या बोटीला खांदेरी किल्ल्यानजीकच्या समुद्रात कलंडून जलसमाधी मिळाली. या बोटीतील आठ जणांपैकी पाच जण सुखरूप असून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली. करंजा येथून तुळजाई मासेमारी बोट सकाळी मासेमारीसाठी निघाली होती. 


हवामान खात्याने सागरी किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. तरी देखील भर पावसात लाटांचा मारा सहन करीत कारंजा येथील मनोहर कोळी यांची तुळजाई नावाची बोट मासेमारीसाठी समुद्रात झेपावली होती. 



शनिवारी सकाळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसासह लाटांचा मारा या बोटीला सहन झाला नाही. यामुळे तुळजाई मासेमारी बोट खांदेरी किल्ला परिसरातील समुद्रात कलंडली. आणि या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीमध्ये नाखवासह सात जण असे एकूण आठ जण होते. बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच बोटीवरील आठही जणांनी समुद्रात उद्या घेतल्या. आठ जणांपैकी पाच जण पोहत बाहेर आलेले आहेत. ते किरकोळ जखमी आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे.*करंजातील तुळजाई मासेमारी बोटीला जलसमाधी पाच खलाशी सुखरूप तीन खलाशी बेपत्ता.*


उरण करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीच्या तुळजाई नावाच्या मासेमारी करणाऱ्या बोटीला खांदेरी किल्ल्यानजीकच्या समुद्रात कलंडून जलसमाधी मिळाली. या बोटीतील आठ जणांपैकी पाच जण सुखरूप असून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली. करंजा येथून तुळजाई मासेमारी बोट सकाळी मासेमारीसाठी निघाली होती. हवामान खात्याने सागरी किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने मच्छीमार बांधवांना खोल समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. तरी देखील भर पावसात लाटांचा मारा सहन करीत कारंजा येथील मनोहर कोळी यांची तुळजाई नावाची बोट मासेमारीसाठी समुद्रात झेपावली होती. शनिवारी सकाळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसासह लाटांचा मारा या बोटीला सहन झाला नाही. यामुळे तुळजाई मासेमारी बोट खांदेरी किल्ला परिसरातील समुद्रात कलंडली. आणि या बोटीला जलसमाधी मिळाली. या बोटीमध्ये नाखवासह सात जण असे एकूण आठ जण होते. बोट बुडणार असल्याचे लक्षात येताच बोटीवरील आठही जणांनी समुद्रात उद्या घेतल्या. आठ जणांपैकी पाच जण पोहत बाहेर आलेले आहेत. ते किरकोळ जखमी आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे.


तसेच पावसाळी मासळी बाजार बंद असताना मासळी बोटी समुद्रात

कोणाच्या आशीर्वादाने चालतात. असा प्रश्न देखील उद्भवू लागला आहे.

 बोटीवरील सुखरुप बचावलेले बोटीवरील खलाशी आणि तांडेल 

1) हेमंत बळीराम गावंड , वय - 45 रा.आवरे ता. उरण

2) संदीप तुकाराम कोळी , वय - 38 रा. करंजा ता . उरण

3) रोशन भगवान कोळी वय - 39 रा. करंजा ता. उरण



4) शंकर हिरा भोईर वय - 64 रा. आपटा ता . पनवेल

5) कृष्णा राम भोईर वय - 55 रा. आपटा ता . पनवेल

तसेच अद्याप मिसिंग असलेल्या व्यक्तींची नावे:

1) नरेश राम शेलार

2) धीरज कोळी रा. कासवला पाडा उरण

3) मुकेश यशवंत पाटील

Comments

Popular posts from this blog