आवाज कोकणचा / नवी मुंबई
महिला उत्कर्ष समिती ऐरोली विभागातर्फे रबाळे पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट..
प्रतिनिधी / नवी मुंबई
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवनियुक्त नवी मुंबई उपाध्यक्ष सौ. विजया निमसे यांच्यासह ऐरोली विभाग अध्यक्ष सौ मानसी धनावडे यांनी पत्रकार उत्कर्ष समिती प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकाऱ्यांसह रबाळे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री गवळी यांची सदिच्छा भेट घेतली व महिला उत्कर्ष समितीच्या कार्याची माहिती त्यांना दिली तसेच पुढील महिन्यात येणाऱ्या भावा बहिणीच्या पवित्र सणाला रक्षाबंधन करण्यासाठी परवानगी घेतली.
सध्याच्या काळात महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे , त्यांच्यावरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसते, कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली पाहावयास मिळते आणि सामाजिक परिस्थिती ही बदललेली दिसून येते या सर्वातून महिलांना मदतीचा हात मिळावा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडता यावी व समस्यांचे निराकरण करता यावे तसेच महिला आत्मनिर्भर व आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात याकरिता महिला उत्कर्ष समिती कार्यरत असते व याच कार्याची माहिती सदस्य व पदाधिकाऱ्यांनी रबाळे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देऊन त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी ऐरोली विभाग उपाध्यक्ष सौ. जयश्री फडतरे , सभासद सौ.काजल साळवे, सौ .सविता कौठेकर , सौ.रुपाली शिंगे , सौ. शशिकला अहिरे , सौ. अलका पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होत्या.
Nice 🙂👍
ReplyDelete