आवाज कोकणचा / नवी मुंबई 

माजी मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त


  नागाव,केगाव , म्हातवली शाळेत ओळखपत्र व गणवेश वाटप...


उरण / पुजा चव्हाण 

              दिनांक 29/7/2025 रोजी   रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव  ठाकरे   यांच्या वाढदिवसानिमित्त   गणवेश , ओळखपत्र व शैक्षणिक साहित्याचे  वाटप करण्यात आले . या वेळी उरण तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या  कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांनी शिकवलेल्या धड्याचा आदर्श ठेवत  80% समाजसेवा व 20% राजकारण या तत्त्वानुसार  विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यांनी आज मराठी शाळेचे विद्यार्थी ही इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या सारखेच गणवेश परिधान करून त्यांच्या सारखे दिसावे तसेच त्यांच्या शाळेची ओळख देण्यासाठी व त्यांची ओळख पटावी म्हणून ओळखपत्रे , कंबर पट्टे , ,    टाय असे शालेय गणवेश सामानाचे वाटप यावेळी करण्यात आले.



      याप्रसंगी आलेले प्रमुख पाहुणे नरेश रहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही देखील मराठी शाळेत शिकून आज या पदावर आहोत आणि तुम्ही देखील उद्या असेच शिकत मोठे व्हा .

मराठी शाळेतील मुलं ही खूप हुशार असतात व तुम्ही देखील असे शिकून मोठे व्हा व आमच्यासारखे समाजाला पुढे मदत करा असे असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाप्रमुख  . नरेशजी रहाळकर , संतोष ठाकूर तालुका प्रमुख,   बी. एन. डाकी तालुका संघटक,   जयवंत  पाटील तालुका संघटक,   सर्यकांत दर्णे,   एस. के. पुरो विभाग प्रमुख,  आशिष तांबोळी माजी सरपंच केगांव,  चेतन गायकवाड सरपंच नागांव ग्रामपंचायत  मोहन काठे सदस्य ग्रामपंचायत नागांव,  . चेतन नावलगी सदस्य ग्रामपंचायत म्हातवली,   सचिन म्हात्रे शाखाप्रमुख नागांव इत्यादी मान्यवर उपस्थित राहून शाळेतील मुलाचा आनंद द्विगुणित करून कार्यक्रमाची शोभा वाढविली व सर्व लहान मुलांनी व उपस्थित सर्व मान्यवरांसह   सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी माननीय माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख  राज्याचेमाजी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे साहेबाना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog