आवाज कोकणचा / नवी मुंबई 

 




दिवाणी न्यायालय क.स्तर उरण, तालुका विधी सेवा समिती उरण मार्गदर्शन शिबीर एन,आय हायस्कूल येथे संपन्न...

वार्ताहर पूजा चव्हाण.

दिनांक २२/०७/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता शिक्षण प्रसारक कै. गोपाळ नारायण अक्षीकर विद्या संकुल, (NI9 High School) ता. उरण, जि. रायगड येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करणेत आले होते. सदर कार्यक्रमास मा. एम. एस. काझी, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर उरण तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, उरण, मा. एस. पी. वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर उरण, मा. जी. के. आर टंडन, दुसरे सह दिवाणी नयायाधीश, क.स्तर उरण, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. व्ही. एल. पाटील, ॲड. अमर पाटील, ॲड. धिरज डाकी, ॲड. संघश्री गायकवाड व इतर वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा. श्री. सर्जेराव ब. पाटील व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. 



सदर कार्यक्रमाची सुरुवात ॲड. अमर पाटील यांनी सुत्रसंचालन करुन केली. तसेच ॲड. संघश्री गायकवाड यांनी जागतिक अंतरराष्ट्रीय न्याय दिना विषयी संदर्भित माहिती दिली. त्यांनी नागरिक सजगतेचा सिद्धांत याबद्दल ही सांगितले. न्याय म्हणजे काय व त्याच्याशी निगडीत असलेले कायदे व वाहतूक नियमांचे पालन करणं, सत्य बोलणे आणि प्रमाणिक व्यवहार, घटक-घटकानं निर्माण होणारे कायदेशीर संस्कार अशे उदाहरणे देऊन त्याचे महत्व पटवून दिले व  तसेच ॲड. धिरज डाकी यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त संभाषण करुन त्याबद्दल जागृकता निर्माण केली. या निमित्ताने अनियंत्रित लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित केले व वाढत्या लोकसंख्येची जाणीव समाजाला करून देणे हा लोकसंख्या दिन साजरा करण्याचा पहिला उद्देश आहे असे सर्वांच्या निर्दशनास आणून दिले. अध्यक्षणीय भाषणात मा. एम. एस काझी यांनी जागतिक लोक संख्या दिवस व जागतिक अंतरराष्ट्रीय न्याय दिवस या संदर्भात विस्तारीत माहिती सांगितली. ॲड. अमर पाटील यांनी आभारप्रदर्शन करुन सदर शिबीराची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog