आवाज कोकणचा / नवी मुंबई
नगराज शेठ सीबीएसई स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठया उत्साहात साजरा...l
उरण / पूजा चव्हाण
संपूर्ण महाराष्ट्रच आराध्यदैवत मानल्या जाणाऱ्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदाय महिनाभर पायीचालत दिंडी पालखी घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपुरला रवाना होतो.युगेनायुगे ही परंपरा चालत आली आहे,
भारतीय संस्कृतीमधील हा एक भक्तीचा महासंगम आहे.ही परंपरा पुढील पिढीत सुरु राहावी या साठी “ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस” म्हणत विठठू माउलीचे नामस्मरण करीत उरण मधील नगराज शेठ सीबीएसई स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठया उत्साहात ससाजरा झाला.
आज स्कूलचा सारा परिसर भक्तीमय वतावरणाच्या भवसागरात बुडून गेला हो प्रत्येक विध्यार्थी टाळ-चिपळ्या हाती घेऊन वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषेत दाखल झाला होता.बरोबरीने शिक्षकांनीही पारंपारिक वेशभूषा करून चिमुकल्यांच्या वारीला साथ दिली होती. प्रथेप्रमाणे या भक्तीमय सोहळ्याचा शुभारंभ नागरी संरक्षण दल उरण कार्यालयाचे एडीसी शशिकांत शिरसाठ साहेब यांच्या हस्ते श्री गणेशव विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला पुष्पहार घालून व पारंपारिक आरती करून करण्यात आली.यावेळी संपन्न झालेल्या आरतीच्या कार्यक्रमात विद्यालयाचे व्यवस्थापक प्रदीप पाटील,यांच्या सह सर्वशिक्षकवृंद,शिक्षेकेतर कर्मचारीआणि विद्यार्थीयांनी सहभाग घेतला तर आपल्या सुस्वरआवाजात स्कूलच्या प्रिन्सिपॉल ज्योती म्हात्रेयांनी आरती गायली.
आरती नंतर “पुंडलीकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम” च्या जय घोषात चीमुल्याची वारी टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी घेऊन वारीला निघाली विद्याल्यायांतून शुभारंभ करण्यात आलेली पालखी क्रीडासंकुलात आल्याव ररिंगण करूनप्रदक्षिणा घातल्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने फुगड्या घातल्या चिमुकल्यांच्या उत्साहाला जणू उधाणच आले होते.दिंडी पालखीने प्रदक्षिणा पूर्ण केल्या नंतर ही वारीस्कूल मध्ये परत आली या नंतरविद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यकौशल्यातून विविध वीठूमाउलीच्या संदर्भांतील नृत्यकलाकृती सादर केल्या,त्याच प्रमाणे शिक्षकांनी आषाढी एकादशी व वारीसंप्रदया बाबत माहिती दिली तर वारीबाबत काही विद्यार्थ्यांनी माहिती विषद केली.पून्हा एकदा पांडुरंगाच्या नामस्मरणाने आषाढी एकादशी सोहळ्याची सांगता झाली.
Comments
Post a Comment