आवाज कोकणाचा / नवी मुंबई
उरण न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वतीने सागरी सुरक्षा हेल्पलाईन नंबर १०९३ ची जनजागृतीचे अनुषंगाने मॅरेथॉन स्पर्धेचे २०२५ आयोजन.
वार्ताहर पूजा चव्हाण
आज दिनांक 27/07/2025 रोजी सकाळी 07:00 ते 09ः00 च्या दरम्यान पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई आस्थापनेवरील न्हावाशेवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बी. टी. ओवे साहेब यांचे मार्गदर्शनाने व मौजे पाणजे, डोंगरी या गावातील सागर रक्षक दलाचे सदस्य यांच्या सौजन्याने फुंडेगाव बस स्टॉप ते पाणजे गावचे कमानीपर्यंत सागरी सुरक्षा हेल्पलाईन नंबर १०९३ ची जनजागृतीचे अनुषंगाने मॅरेथॉन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले.
सदर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे अधिकारी वपोनि. बी. टी. ओवे, सपोनि. मनोज गुंड, सपोनि. गणेश पाटील, पोउपनि. शांताराम लेंडे व अंमलदार सफौ. जितेंद्र पाटील, पोहवा. मंगेश पवार, धर्मनाथ चेरू, प्रदिप म्हात्रे, संजय म्हात्रे, संदीप पाटील, प्रवीण गावित, कनिष्का नाईक, सचिता पाटील, किरण टिके, इत्यादी तसेच सौजन्यपूर्वक सहभागी झालेले मान्यवर मौजे पाणजे गांवचे सरपंच श्री. लखपती पाटील व ग्रामस्थ, मौजे सोनारी गावचे श्री.राकेश कडु, श्री. दिनेश कडु, सौ.सुजाता कडु, मौजे डोंगरी गावचे श्री. संकेत घरत, श्री. किरण पाटील, इत्यादी मान्यवर व वरील कमिटीचे सदस्य ग्रामस्थ असे मिळून एकूण २५० सदस्यांनी भाग घेऊन मॅरेथॉन २०२५ कार्यक्रमास शोभा आणली.
सदर मॅरेथॉन स्पर्धा कार्यक्रमामधील विजेत्यांना उत्तेजनार्थ ट्रॉफी बक्षीस देऊन कार्यक्रमाची परिपूर्ती झाली. न्हावाशेवा पोलीस ठाणे सागरी सुरक्षा रक्षक दल सदस्य आयोजित मॅरेथॉन स्पर्धा २०२५ चा कार्यक्रम शांततेत पार पडलेला आहे.
Comments
Post a Comment