आवाज कोकणचा / नवी मुंबई

उलवे प्रतिनिधी

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे उरण रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी .. लवकरच प्रवाशांना मिळणार दिलासा ...



पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह रेल्वेचे मुख्य विभागीय अधिकारी यांची भेट घेऊन बेलापूर ते उरण व नेरूळ ते उरण या अंतरातील फेऱ्या वाढवण्याची मागणी केली .

नवी मुंबईतील पनवेल उरण हा विभाग अत्यंत वेगाने विकसित होत आहे लवकरच सुरू होणारे विमानतळ, न्हावा शेवा बंदर , एम एस ई बी , ओएनजीसी याच्यासह मोठ्या प्रमाणावर मालाची साठवणूक करण्यासाठी असलेली गोडाऊन यामुळे या भागात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते .



उरण ते बेलापूर व नेरूळ अशी दर तासाला एक गाडी सुटत असते त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गर्दी राहतेच शिवाय या मार्गावर प्रवास करताना दोन्ही बाजूने एक तासाने गाडी असल्यामुळे प्रवाशांची वेळेअभावी मोठी कुचंबांना होते प्रवाशांच्या या समस्येवर तोडगा निघावा व जनतेला सुखकर प्रवास करता यावा यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीने अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की एक-दोन महिन्यांमध्ये येथील विमानतळ सुरू होणार आहे तोपर्यंत या मार्गावरील फेऱ्या वाढतील तसेच तरघर व गव्हाण ही दोन्ही रेल्वे स्थानके पूर्ण वापरात येतील.

Comments

Popular posts from this blog