आवाज कोकणचा / नवी मुंबई

 ग्लॅम पनवेल 2025 सौंदर्य स्पर्धा जल्लोषात संपन्न...


प्रतिनिधी / पनवेल

सौंदर्यतज्ञ रेखा पाटील यांचा अनोखा उपक्रम...

नवी मुंबईच्या नामांकित सौंदर्यतज्ञ रेखा पाटील यांच्या प्राप्ती ब्युटी तर्फे आयोजित सौंदर्य स्पर्धा पनवेल येथील खानदेश हॉटेल येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. 


या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अतिशय उच्च दर्जाच्या अशा या स्पर्धेमध्ये विभागातील जवळपास शंभरहून अधिक युवतींनी सहभाग घेतला होता.

पनवेल विभागातील सौंदर्यतज्ञ सौ. संचीता मोकल, प्रगती दमडे, कल्याण डोंबिवली विभागातील प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ आचल ठाकूर यांच्या ग्रुप मधील स्पर्धकांनी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून आले तर , त्यांच्या स्पर्धकांना विशेष प्राविण्य पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


सध्या स्पर्धेचे युग असून अनेक वेळा उच्च शिक्षण घेऊनही नोकरी उपलब्ध होत नाही त्यावेळी अशा अनेक युवतींना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहित करून प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळत असल्याचे डॉ. अशोक म्हात्रे यांनी सांगितले. 

सौंदर्य ही आजच्या काळात गरज बनत असल्याचे दिसून येत आहे या क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध असल्याने युवतीनी यात मोठ्या संख्येने यावे व आपले आर्थिक सक्षमीकरण करावे यासाठी अशा कार्यक्रमांची आखणी करत असल्याचे रेखा पाटील यांनी सांगितले.



Comments

Popular posts from this blog