आवाज कोकणचा / नवी मुंबई
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहुल यांची खालापूर येथे बदली...
उरण वार्ताहर ( पूजा चव्हाण )
नवी मुंबई बंदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहुल यांची खालापूर जिल्हा रायगड या विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक पदी बदली झाल्याचे समजते आहे. त्यांनी आपल्या पोलीस विभागात उच्च पदावर कार्यरत असतानाही सर्वांना नेहमी समान वागणूक दिली.आजवर कधीही कोणाशीही भेदभाव केला नाही. ते कातकरी असो किंवा कोणीही राजकारणी असो त्यांनी नेहमी सर्वांनाच समान वागणूक देऊन समाजातील प्रत्येक व्यक्तीस उचित सन्मान दिला, तसेच नेहमी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी यशस्वीरिता केला असे.
तसेच त्यांचे बदली झाल्याचे समजताच सर्वसामान्य जनतेला वाईट वाटले आणि त्यांनी हळहळ व्यक्त करत सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर नवी मुंबई पोट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पदी किशोर गायके यांची नियुक्ती झालेले असल्याचे समजत आहे.
Comments
Post a Comment