आवाज कोकणचा  - ठाणे

प्रतिनिधी - कल्याण

 महिला उत्कर्ष समितीचा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा..

जवानांनी दिली बहिणीच्या सुरक्षेची हमी..

पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. स्मिता पार्टील , प्रदेश कार्याध्यक्ष सौ. श्रुति उरणकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे सुरक्षा बल कल्याण विभागाच्या


 जवानांना सदस्या सौ. सविता ठाकुर , सौ. स्वाती हिरवे ,  सौ. स्वप्नाली पाचाळ , सौ विद्या वाघ , सौ. मिना अहीरे , सौ. शशिकला ठाकूर.  सौ. सुवर्णा धन‌गर. , सौ. उमा कारले , सौ.  मंजुळा शेट्‌टी , सौ.  प्रमिला जाधव, सौ.  गिता राजपूत , सौ.  संस्कृति करवंदे यांनी राखी बांधून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला. 



देशाच्या कानाकोपऱ्यातून येऊन रेल्वेची सुरक्षा करण्याचे कार्य आपल्या खांद्यावर घेतलेल्या या जवानांना आपल्या घरादारापासून दूर असल्यामुळे रक्षाबंधन हे स्वप्नवत असते परंतु मला उत्कर्ष समितीच्या या सदस्यांनी त्यावर योग्य मार्ग काढत आपल्या विभागात कार्यरत या जवानांना राखी बांधून बहिणीची कमी भरून काढली.



रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ कमांडंट विनोद कुमार , सह कमांडर ऑफिसर एस डी देशपांडे ,  असिस्टंट कमांडर रुपेंद्रा सिंग , इन्स्पेक्टर जीआर पांडे , इन्स्पेक्टर पी. आर.  सुदर्शन , इन्स्पेक्टर बी. के. सिंह  या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जवळपास 150 हून अधिक जवानांना यावेळी राखी बांधण्यात आली.




Comments

Popular posts from this blog