आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधी / वाशी
महिला उत्कर्ष समिती तुर्भे तर्फे पोलीस बांधवांना पर्यावरण पूरक राखी बांधून दिला वेगळा संदेश ....
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या तुर्भे विभागीय सदस्यांनी एक वेगळा विचार मांडत पर्यावरण पूरक राखी वाशी तुर्भे पोलीस ठाण्यातील बांधवांना बांधून भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला एक वेगळे रूप दिले.
पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे व महिला उत्कर्ष समिती प्रदेश अध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे विभाग अध्यक्ष वंदना आंबवले,
उपाध्यक्ष राणी दळवी, सदस्य रेखा पंडित , सुवर्णा मस्के, शीला काकडे, मंजुषा कानडे यांनी ही पर्यावरण पूरक राखी बांधून एक वेगळा संदेश समाजाला दिला आहे.
अनेक वेळा राखी बांधून झाल्यानंतर ती काही दिवसातच कचऱ्यात फेकली जाते परंतु आज या सदस्यांनी बांधलेली ही राखी जरी कचऱ्यात फेकली तरीही तिचे एका रोपामध्ये रूपांतर होणार आहे.
राखी साठी वापरण्यात आलेला धागा हा सुद्धा पर्यावरण पूरक असून मातीमध्ये मिसळल्यानंतर त्याचे खतात रूपांतर होते तर राखी मध्ये असलेले बीज हे रोपात परावर्तित झाल्यानंतर वातावरणात ऑक्सिजन निर्माण करणारे व वायु प्रदूषण नियंत्रणात ठेवणारे असे आहे.
या उपक्रमामुळे महिला उत्कर्ष समितीच्या या सदस्यांवर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Khup chan
ReplyDelete