आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल - प्रतिनिधी
सेंट जॉन्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉ. अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण...
डॉ. वैभव पाटील यांनी दिले देशभक्तीचे धडे...
पनवेल तालुक्यातील कोळखें येथील सेंट जॉन्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेत पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यावेळी बोलताना ज्या रायगड भूमीमध्ये ही शाळा आहे त्या भूमितीतूनच सगळ्यांचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वातंत्र्यासाठी उठाव करून मुगल शाही विरुद्ध अनेक लढाया करून स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ कशी रोवली या विषयी त्यांचा जीवनपट उलगडून दाखवत तत्कालीन मुगल बादशहा विरुद्धची लढाई तसेच इंग्रजांविरुद्धची आक्रमक चळवळ याची सांगड घालत स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्य नंतरचे परिस्थिती याविषयी आपले मत मांडले.
या कार्यक्रमासाठी आवाज कोकणचा चे संपादक डॉ. वैभव पाटील , महिला उत्कर्ष समिती प्रदेश उपाध्यक्ष सौ आरती पाटील , नवी मुंबईतील प्रसिद्ध कराटे प्रशिक्षक श्री. शैलश ठाकूर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
शाळेचे व्यवस्थापक लिबु म्याथ्यु, प्राचार्य सुसान थॉमस , फादर प्रभाकर , महेश, राकेश, यांच्यासह व्यवस्थापकीय कर्मचारी उपस्थित होते.
Very nice Sir 👍
ReplyDelete