आवाज कोकणचा  / नवी मुंबई 

प्रतिनिधि  / उलवे 

स्वराज्य मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष समाजसेवक  श्री अविनाश भगत यांच्या दूरदृष्टीने शैक्षणिक साहित्य वाटप...

पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित..


उलवे नोड जवळील जावळे गाव येथे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वराज्य मित्र मंडळ शेलघर चे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक श्री. अविनाश भगत यांच्या वतीने समाजातील गरिबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजामध्ये नाव कमवून मोठा व्हावा व देशाचा एक सुजाण नागरिक तयार व्हावा यासाठी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने श्री भगत व त्यांचे सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ. म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षण भविष्यासाठी कसे अति आवश्यक आहे याविषयी आपले मत मांडले. 


समाजातील गरीब श्रीमंत ही दरी दूर करायची असेल तर ती फक्त शिक्षित होऊनच कमी केली जाऊ शकते असे अविनाश भगत यांनी सांगितले त्यासाठीच अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन ते करत असतात. 



 या कार्यक्रमासाठी सहकारी प्रशांत भगत , शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रोशन घरत , उद्योगपती महेश नाईक, गावचे वरिष्ठ नागरिक नागरीक काशिनाथ घरत , वहाळ ग्राम पंचायत सदस्य प्रमोद कडू , प्रेरणा महिला मंडळ अध्यक्ष वंदना भगत ,


 विठू माऊली महिला मंडळ अध्यक्ष ज्योत्स्ना भगत, 


सदस्य सुनिता म्हात्रे , अंजनी भगत सारिका भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.





Comments

Popular posts from this blog