आवाज कोकणचा / नवी मुंबई
पत्रकार उत्कर्ष समिती व स्वराज्य मित्र मंडळाचा उपक्रम लहानग्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप...
शैक्षणिक साहित्य हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद..
पनवेल ता.२३ (बातमीदार अशोक घरत)
पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्र राज्य व स्वराज्य मित्र मंडळ शेलघर यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील रा.जि.प.शाळा कातकरी वाडी, खानावले येथील शाळेत इयत्ता १ली ते ५ वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच गोड कॅडबरी चॉकलेटसही देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेच्या सहशिक्षिका नयना ठोंबरे यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेतील बाल विद्यार्थ्यांकडून मान्यवरांसाठी स्वागत गीत गाण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका शफिया शेख यांनी आपल्या प्रास्ताविक मधून विद्यार्थ्यांसाठी शासनाचे असलेले शैक्षणिक धोरण व काही उपक्रम आणि त्या उपक्रमांतर्गत त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करत असलेले प्रयत्न आणि त्याचा वापर आपल्या शब्दांत मांडला.
विद्यार्थ्यांचा भावनिक, सामाजिक, मानसिक आणि शारीरिक विकास होऊन, विद्यार्थी भावी पिढीत सक्षम नागरिक बनावे या हेतूने शिक्षण मंत्रालयाने
"निपुण भारत योजना" सुरू केली आहे. यामध्ये सर्व इयत्तांचा स्तर निश्चित केलेला आहे. प्रत्येक मुलाला लहान वयातच वाचन, लेखन आणि गणिती कौशल्य शिकता यावीत, यासाठी सुरू केलेला हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्य प्राप्त व्हावे हे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आवड व क्षमतेनुसार त्यांना शिक्षण द्यावे, केवळ घोकंपट्टीवर भर न देता, मनोरंजनात्मक खेळातून, कृतीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवावे व त्यांचा सर्वांगीण विकास करावा हाच मुख्य हेतू आहे.
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी आपले मनोगत छान शब्दात मांडले. ते म्हणाले शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या भिंतीवर असलेल्या महान व्यक्तींची नावे काय आहेत ? असे विचारले असता,विद्यार्थ्यांनी त्यांची नावे अचूकपणे ओळखून सांगितली. तेव्हा डॉ. म्हात्रे यांनी या महान व्यक्तींना आपल्या देशासाठी केलेले त्याग आणि प्राणार्पण, त्यांच्या या कार्यातून आपण स्फूर्ती व त्यांचे अनुकरण आचरणात आणायचे आहेत. त्यांच्या या कृतीतून सुजान व सुशिक्षित भावी नागरिक बनून, चांगले शिक्षण घेऊन, मोठे होऊन आपल्या समाजाला आणि स्वतंत्र भारताला कसा फायदा होईल हे पाहिले पाहिजे.
नंतर पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा सचिव अशोक घरत हे व्यक्त होताना म्हणाले शाळेतील बाल मित्रांनो,शिक्षण हेच खरे दान आहे. पैसा,वस्तू आणि पद हे सगळे नाशवंत आहे पण ज्ञान हे कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही.त्यामुळे अभ्यासाची आवड जोपासा,शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि स्वप्न मोठी पहा.
आज आम्ही दिलेले शैक्षणिक साहित्य कदाचित छोटे वाटतील पण ह्याच लहान साहित्यातून तुमचं आयुष्य घडणार आहे.गावाचा,समाजाचा आणि आपल्या देशाचा विकास तुमच्या शिक्षणावरच अवलंबून आहे.
आपल्या या शाळेतील शिक्षक वर्गाला मी मनापासून नमन करतो. तुम्ही या शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून, समाज प्रबोधनाचं कार्य करत आहात. त्यांच्यामुळेच ही मुले,उद्याचे व भविष्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत.पालक आणि गावकऱ्यांना विनंती केली मुलांना शिकण्यासाठी पाठिंबा द्या,विशेषता मुलींना शाळेत जाऊ द्या.शिक्षण मिळाले तर मुलगी ही कुटुंब,समाज आणि राष्ट्राचा अभिमान वाढवते.सर्वात शेवटी महत्त्वाचे सांगितले ते म्हणजे,शिक्षण ही खरी ताकद आहे,या ताकदीने तुम्ही कितीही मोठे होऊ शकता. त्यामुळे अभ्यासाला कधीही कमी लेखू नका.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका शेख मॅडम यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व विशेष आभार म्हणून ज्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणण्यास खूप मोठी मोलाची मदत केली,ते पनवेल तालुक्यातील शेलगर गावचे "स्वराज्य मित्र मंडळाचे" पदाधिकारी अविनाश भगत (संस्थापक) व प्रशांत भगत (अध्यक्ष) या दोघांचे आभार मानले.
Comments
Post a Comment