आवाज कोकणचा / नवी मुंबई  

प्रतिनिधि 

सावित्रीबाई फुले पूर्व प्राथमिक शाळेमध्ये ध्वजारोहण व दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न....


नवी मुंबईतील तुर्भे येथे सावित्रीबाई फुले पूर्व प्राथमिक शाळेमध्ये स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन सोहळा व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या प्रमुख संचालिका मीरा जाधव यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे , माजी नगरसेविका कविता पाटील , समाजसेवक ज्ञानेश्वर पाटील , संगीता शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्वातंत्र्याची खरी मुहूर्तमेढ रोवलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


त्यानंतर ध्वजारोहण करून उपस्थित चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना अंबवले , राणी दळवी , शोभा साळुंखे यांच्यासह शाळेच्या शिक्षक व कर्मचारी वृंदाने या कार्यक्रमासाठी मोठी मेहनत घेतली असल्याचे दिसून आले. यावेळी पूर्व प्राथमिक वर्गातील लहान चिमुकल्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .भारत माता , भगवान श्रीकृष्ण , राधा अशी विविध वेशभूषा केलेले हे बाल विद्यार्थी अत्यंत दिमाखात वावरताना दिसत होते,  दरवर्षी शाळा आपली भारतीय संस्कृती व परंपरा याचे जतन करत असल्याचे दिसून येते सर्वच सण दरवर्षी मोठ्या थाटामाटाने साजरे करून या बालमनावर आपली संस्कृती व परंपरा जतन करून भावी पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेत असल्याचे दिसून येते. 



Comments

Popular posts from this blog