आवाज कोकणचा / रायगड
आई न्यूज व एंटरटेनमेंट युट्युब चॅनेल चा वर्धापन दिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न..
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता मोरे, उपशिक्षिका सुरेखा केत, अंगणवाडी सेविका शुभांगी ताई,आई न्यूज मुख्य संपादक अक्षय पाटील, संपादक स्वाती पाटील, सहकारी आदित्य पाटील अजिंक्य पाटील,मन शिवकर, ध्रुव पाटील, पहिली ते सातवी पर्यंतचे प्रभुसमान विद्यार्थी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या वेळी विद्येचे आराध्य दैवत श्री गणेश व महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी जिल्हा परिषद शाळा तरणखोपच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवनगीत,राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आई न्यूज एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल आज तागायत सहा वर्षाचा प्रवास केला आहे. मुख्य संपादक अक्षय पाटील यांनी प्रास्ताविकातून हा सांगितला जो शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखा आहे.आर्थिक बाजू कमकुवत असताना सहा वर्ष पूर्ण केले आणि सातव्या वर्षामध्ये पदार्पण देखील चैनल ने केलेल आहे. कोरोना कालावधीमध्ये चॅनलचे खूप मोठे योगदान राहिले आहे , आई मेजवानी, सेलिब्रिटी मंच , आयपीएल फोर्थ एम्पायर, बायोग्राफी, राज्यस्तरीय रांगोली स्पर्धा आणि ग्रामीण भागातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी व समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सोहळा आनंदाचा असे विविध कार्यक्रम या आजपर्यंतच्या सहा वर्षांच्या प्रवासामध्ये करण्यात आले. पुढे देखील चांगले चांगले उपक्रम या चॅनेलच्या माध्यमातून होतील असा शब्द आपल्या प्रास्ताविकातून मुख्य संपादक अक्षयbपाटील यांनी दिला.
आई न्यूज एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल च्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त पहिली ते सातवी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता मोरे,पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पत्रकार उत्कर्ष समिती पेण तालुका अध्यक्ष अक्षय पाटील व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आई न्युज संपादक स्वाती पाटील यांनी केले.
पेण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री बागुल, वडखळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री . पांढरे, दादर सागरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. ब्राम्हणे यांनी चॅनलच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment