आवाज कोकणचा / नवी मुंबई


रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिला उत्कर्ष समितीने पोलीस बांधवांना बांधली राखी ...

प्रतिनिधि / ऐरोली 

पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या ऐरोली विभाग विभागाने आपल्या घरादारापासून दूर राहून समाजात शांतता नांदावी, गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील पोलीस बांधवांना राखी बांधून भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.


महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई उपाध्यक्ष विजया निमसे



 यांच्या सह ऐरोली विभाग अध्यक्ष मानसी धनावडे,




 शशिकला अहिरे, डॉ. जयश्री फडतरे, दीपाली जगताप, काजल शशीकांत साळवे, सविता कोठेकर, अलका पाटील यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 



या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.







Comments

Popular posts from this blog