आवाज कोकणचा नवी मुंबई
तुर्भे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..
परिसरात चोरीस गेलेले व हरवलेले एकून 63 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून..
उरण - पुजा चव्हाण
आज आपल्या जीवनात मोबाईल चे महत्व खूपच वाढले आहे.त्या मुळे मोबाईल हा अत्यंत गरजेची झाला आहे . व असे असताना आपला मोबाईल हरवला किंवा कोणी चोरीस गेला तर आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.
एखादा मोबाईल चोरीस गेलाच तर तो शोधने खुप कठीण होते. असे आसताना सुद्धा तुर्भे पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक पद्धतीने तपास करून पोलिस नाईक 3166 रोहित राठोड यांनी भारतातील ऐकून 63 मोबाईल अंदाजे किंमत 12,03,769/- हस्तगत करण्यात यश मिळाले.
तर हे सर्व मोबाईल गुरुवारू दिनांक 7/6/2025 रोजी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल सन्मानपूर्वक परत करण्यात आले.
या वेळी मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले.
जनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचावल्याबद्दल पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी अमलदार यांची नागरिकांनी विशेष उल्लेख करून आभार व्यक्त केले असे आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी माहिती देताना आपल्या माहितीत सांगितले.
Comments
Post a Comment