आवाज कोकणचा  - नवी मुंबई 

प्रतिनिधी - पनवेल


 महिला उत्कर्ष समिती रायगडचा पनवेल शहर व ग्रामीण पोलीस  जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा..


पत्रकार उत्कर्ष समिती  महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.  अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष सौ करुणा पाटील यांनी आपल्या सहकारी कुलसुम शेख,  प्रियंका कदम , सीमा सावंत , प्रीती कुलकर्णी यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन व पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस जवानांना राखी बांधून भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन साजरा केला.


राज्याच्या विविध भागातून येऊन कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करत आपले कर्तव्य पार पडणाऱ्या या बांधवांना जवानांना घरच्या बहिणी पासून दूर राहून रक्षाबंधन साजरे करावे लागते यासाठीच महिला उत्कर्ष समितीच्या या भगिनींनी या दोन्ही पोलीस ठाण्यातील जवानांना राखी बांधून बहिणीचे प्रेम आणि माया दिली. 





Comments

Popular posts from this blog