आवाज कोकणचा / मुंबई
प्रतिनिधी / मुंबई
कोळी, आगरी, मच्छिमार बंधू भगिनी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक...
लालबागचा राजा मुंबईतील एक प्रसिद्ध आणि अत्यंत श्रद्धेय सार्वजनिक गणपती आहे, जो १९३४ मध्ये स्थापन झाला आणि नवसाला पावतो, म्हणजेच भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो या विश्वासासाठी तो ओळखला जातो.मुंबईकरांसाठी श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक असलेल्या लालबागचा राजा गणेशोत्सवात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कोळी,मच्छिमार, आगरी समाजातील महिला भगिनी व बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
लालबागच्या मच्छिमार्केटमधील कोळी मच्छिमार महिलांनी नवस बोलून स्थापन केलेला गणपती आज जगविख्यात आहे.लालबागच्या राजाचे " चरण स्पर्श दर्शनाचे "आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष व श्री एकविरा भक्त भाविक मंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. जयेंद्रदादा खुणे आणि अखिल भारतीय कोळी समाज समन्वयक व महाराष्ट्र फिशरमन काँग्रेसचे सरचिटणीस श्री. मार्शल कोळी यांनी अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केले होते.
मुख्य प्रवेशद्वारापासून कोळी आगरी पारंपारिक वेशभूषा परिधान करून, कोळी महिलांच्या डोक्यावर गणरायासाठी फळ, फुले अर्पण करण्यासाठी टोपली घेऊन खालू बाजा ( टिमकी बाजा ) वाद्याच्या ठेक्यावर नाचत मुख्य प्रवेशाद्वारा जवळून सभा मंडपात प्रवेश केला.सभा मंडपात प्रवेश करताच गणेश भक्तांमध्ये जल्लोषाचे व उत्साहाचे वातावरून होऊन रांगेत असलेलेले हजारो भक्तही वाद्याच्या ठेक्यावर नाचू लागले व घोषणा देऊ लागले.
त्यानंतर अत्यंत शिस्तपद्धतीने सर्वांनी लालबागच्या राजाचे मनसोक्त चरण स्पर्श दर्शन घेतले.
लालबागच्या राजा चरणाजवळ आगरी समाज नेते श्री. जयेंद्रदादा खुणे यांचा मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कांबळे यांनी सर्वांच्या वतीने सन्मान केला.
यावेळी कोळी महिलांचे नेतृत्व सौ. राजश्री भानजी यांनी केले.महाराष्ट्रातून आलेल्या कोळी, आगरी, मच्छिमार बांधवांकारिता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, स्वागत कक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मान दिल्याबद्दल मंडळाचे श्री. मार्शल कोळी यांनी आभार मानले.
यावेळी श्री. मार्तंड नाखवा ( अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेस ), कु.मिताली मार्तंड नाखवा ( उरण करंजा मच्छिमार ),श्री. परेश कांती कोळी ( अध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र ), सौ. राजेश्री भानजी ( अध्यक्षा मरोळ बाजार मासळी विक्रेता मकोळी महिला संस्था ), डॉ. गजेंद्र भानजी ( मच्छिमार नेते ), सौ. अक्षता म्हात्रे ( अध्यक्षा दक्षिण मध्य मुंबई आगरी सेना म. आ. आगरी सेना ), श्री. रुपेश पाटील ( अध्यक्ष दक्षिण मुंबई आगरी सेना ), श्री. मधुकर भोई ( आगरी युवा नेते ), श्री. जितेंद्र कोळी ( अध्यक्ष कुलाबा कोळी जमात ट्रस्ट ), श्री.धनाजी कोळी ( अध्यक्ष मुंबई काँग्रेस मच्छिमार सेल ), श्री. रोहिदास कोळी ( अध्यक्ष मुंबई कोळी महासंघ), श्री. विजय वरळीकर ( अध्यक्ष माणिक धर्मा जमात ट्रस्ट ), श्री. दिगंबर वैती ( मा. चेअरमन मालवणी मच्छिमार स.सो. लि. ), श्री. किरण कोळी ( सेक्रेटरी महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती ), श्री. निकेश वैती ( अध्यक्ष मुंबई भाजपा मच्छिमार सेल ), श्री. राजहंस टपके ( कार्याध्यक्ष कोळी महासंघ), श्री.सचिन काशिराम चिंचय,
(मा.अध्यक्ष वेसावा कोळी जमात ),श्री. प्रवीण नाखवा ( चेअरमन करंजा मच्छिमार स. संस्था ), श्री. अमोल रोगे ( चेअरमन मल्हारी मार्तंड मच्छिमार स. सो.), श्री. मोहित रामले ( अध्यक्ष अखिल कोळी समाज संवर्धन व संस्कृती संघटना ), श्री.श्याम पाटील (मुख्य समन्वयक महाराष्ट्र मच्छिमार सेना), श्री.मंगेश कोळी ( सेक्रेटरी, महाराष्ट्र मच्छिमार सेना), श्री. हेमंत वैती ( अध्यक्ष मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस मच्छिमार सेल ) , श्री. जयेश आक्रे ( माहीम कोळीवाडा ), सौ. रेखा ठोंबरे, सौ. विद्या तळकर,bश्री. विलास कोळी ( अध्यक्ष कोळी वादळ ग्रुप ), श्री. निलेश म्हात्रे ( अध्यक्ष आगरी युवा सेना दक्षिण मुंबई ) ,श्री. अरुण शिवकर ( सायन कोळीवाडा कोळी समाज ), डॉ. स्मिता तरे (सचिव अखिल भारतीय कोळी समाज ), श्री.हेमंत पाटील ( कल्याण तालुका आगरी समाज ), श्री. अजिंक्य पाटील ( सरचिटणीस अखिल भारतीय कोळी समाज ) ,सौ.अश्विनी पाटील, सौ. गीता पाटील, श्री. सागर आरण, इत्यादी अनेक समाज नेते उपस्थित राहून एकूण २५ कोळी, आगरी व मच्छिमार संस्थांनी एकत्र येऊन सहभाग घेतला होता.
Comments
Post a Comment