आवाज कोकणचा / नवी मुंबई

उलवे नोड ( प्रतिनिधि )

पॅनेशिया हॉस्पीटल व पत्रकार उत्कर्ष समिती आयोजित मोफत आरोग्य शिबिर संपन्न..

शंभरहुन अधिक रुग्णांनी घेतला लाभ...

पनवेल मधील सर्वसामान्य रुग्णांना मानवतेवच्या दृष्टीने नेहमी सेवा देणारे  नामांकित अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुभाष सिंग यांचे  पॅनेशिया हॉस्पीटल व पत्रकारांसाठी राज्यभर कार्य करणारी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रच्या यांच्या  वतीने गव्हाण तालुका पनवेल येथील  स्मित क्लिनिक येथे रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि औषोधपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सर्वरोग निदान शिबिरात सांधेदुखी, संधिवात, वाताचे आजार, मधुमेह, मुतखडा ,लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पाळीचे आजार, केस गळणे, रक्त तपासणी, इसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या.सदर शिबिराचा लाभ शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला. डॉ . कुणाल म्हात्रे यांनी रुग्णांची तपासणी केली. या आरोग्य शिबिरासाठी पॅनेसिया हॉस्पिटलचे श्री. शरद गुप्ता, श्री. संजय तांडेल यांच्यासह डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

यावेळी शरद गुप्ता यांनी महाराष्ट्र शासन व केंद्रशासन यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली तसेच या सर्व योजना पेनिसिया हॉस्पिटल येथे उपलब्ध असून गरिबातील गरीब रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

पत्रकार उत्कर्ष समिती दरवर्षी वृक्षारोपण, नवदुर्गा सन्मान, गुणवंतांचा गौरव, विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबवतात .आज गव्हाण उलवे परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाज जागृती व प्रबोधन करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये निसर्गप्रेमी व समाजसेवक डॉक्टर हरीश पाटील, कीर्तनातून प्रबोधन करणारे ह भ प शरद महाराज सावळाराम कोळी, आपल्या भारदस्त आवाजात गायनातून सामाजिक संदेश देणारे गायक राजकिरण कोळी व गायिका कल्याणी कोळी, वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक सेवा करणाऱ्या डॉक्टर पूजा खारपाटील यांना गौरव चिन्ह व गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले.


यावेळी पत्रकार उत्कर्ष समिती चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, सचिव डॉ वैभव पाटील , सह सचिव ज्ञानेश्र्वर कोळी , खजिनदार शैलेश ठाकूर,  रायगड जिल्हाध्यक्ष मिलिंद खारपाटील ,उरण तालुका कार्याध्यक्ष सचिन घबाडी , महिला उत्कर्ष समिती प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे, नवी मुंबई कार्याध्यक्ष वर्षा लोकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पॅनेशिया हॉस्पिटल व पत्रकार उत्कर्ष समिती च्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Comments

Popular posts from this blog