आवाज कोकणचा / नवी मुंबई 

 उरण पनवेल रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदाराच्या मदतीने अपघातासाठी सापळा ? जनतेमध्ये चर्चा...

समस्येवर तोडगा काढण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती उरण विभाग अध्यक्ष पूजा चव्हाण यांच्यातर्फे अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार...

वार्ताहर  - पुजा चव्हाण


          उरण तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प आहेत त्यामध्ये जे.एन.पी.ए. बंदर समुहा मुळे सातत्याने वाढत असणारी कंटेनर ची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रेलरगाड्यांची वाढती रहदारी त्याच बरोबरीने उरण शहराला सतत्याने भेडसाविणारी वाहनांची वर्दळ आणि वाहतूक कोंडी यामुळे सातत्याने होणारे अपघात आणि या अपघातात भरीसभर टाकणारे “सार्वजनिक बांधकाम खात्याचे उरण विभागीय कार्यालय” आणि ठेकेदार यांच्यात अर्थपूर्ण संबंध राखत उरण पनवेल रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेकेदाराच्या मदतीने अपघातासाठी सापळा रचला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.



 ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांची दोस्ती यांतूनच कुणातरी नागरिकाचा होणारा अपघात याची वाट पाहत असणारे खात्याचे अभियंता हे कौतुकास पात्र असल्याची चर्चा ही उरणच्या नागरिकत नाक्या नाक्यावर सुरु आहे.     

             कारण आहे की गेले कित्येक महिने भरपावसातही अभियंत्यांनी ठेकेदाराची मर्जी सांभाळत कोटनाका व उरण चारफाटा ते बोकडवीरा या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस रस्ता  रुंदीकरण करण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी दिलेली परवानगी. 

उरण रेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूस हे खोदकाम मोठ्या प्रमाणात करून ठेवलेले आहे. उरण कोटनाका ते बोकडवीरा चारफाटा या मार्गावर दोन्ही बाजूने हे खोद काम वेगात सुरु आहे. या मार्गावर दिवस रात्र वाहनांची  वर्दळ मोठ्या प्रमाणात चालू असते.  रेल्वे स्थानकाच्या समोरील बाजूस जे खोदकाम करण्यात आलेले आहे हे काम रस्त्याच्या लगत असल्याने तसेच रात्रीच्या वेळेस या मार्गावर विद्युत दिव्यांची  सोय नसल्याने त्या ठिकाणी ठेकेदाराने किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः नागरिकांच्या  सुरक्षतेच्या दृष्टीने कोणतीही उपायोजना केलेली नाही, खोदकाम केलेल्या ठिकाणी उदा. सुरक्षा पट्टी, व रात्री साठी रिफ्लेक्टर  लावणे बंधनकारक असताना सुद्धा अत्यंत जाणीवपूर्वक सुरक्षितेबाबत कोणतीही उपाय योजना केलेली नाही.

             दोन दिवसांनी तालुक्यात नवरात्रोत्सव सुरु होत असून रात्री मोटार सायकल, कार इत्यादी वाहनांची वर्दळ वाढणार आहे. मात्र संबंधित कामाचे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अपघात केव्हां होणार याच क्षणाची वाट तर पहात नाही ना? आणि अपघात झाल्यावर मोर्चे आंदोलने करणाऱ्या उरणातील विविध सामाजिक संस्था मात्र तोंडावर बोट डोळ्याला पट्टी आणि कानावर हात ठेऊन आहेत अशी चर्चा उरण तालुक्यात सुरु आहे, अखेर या सर्व गोष्टींची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समिती उरण विभागाच्या अध्यक्षा पूजा चव्हाण यांनी उरण सार्वजनिक बांधकाम विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त बंदर विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग उरण यांना लेखी निवेदनपत्र दिले असून या पत्रात त्यांनी शेवटी म्हटले आहे की या ठिकाणी दिवसा किंवा रात्री अपघात घडल्यास व जीवित  हानी झाल्यास या अपघाताची पूर्ण जबाबदारी उरण सार्वजनिक बांधकाम विभाग व सदर कामाचे कंत्राटदार यांची राहील तरी या गंभीर घटनेबाबत त्वरित लक्ष देऊन याबाबत योग्य निर्णय घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा होणारा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी तसेच आपल्या सहकार्याची अपेक्षा अपेक्षितअसल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे.



Comments

Popular posts from this blog