आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधि / उलवे 

श्री शांतादेवी मित्र मंडळाचा उल्लेखनीय पर्यावरण पूरक गणेश विसर्जन सोहळा ...



नवी मुंबईतील झपाट्याने विकसित होत असलेल्या उलवे नोड शहराला लागून असलेले गव्हाण गाव सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे . गव्हाण  ग्रामपंचायत हद्दीतील  श्री शांता देवी या आराध्य  देवतेच्या नावावर असलेले श्री शांता देवी मित्र मंडळ हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. 



मागील पंधरा वर्षांपासून या मंडळाचे युवा  पदाधिकारी रमाकांत पाटील  , मनोज वासकर , समीर ठाकूर, अजय कडू , रामनाथ ठाकूर , नितीन वासकर , दिनेश पाटील , चेतन पाटील , सुजित पाटील हे सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गावातील विविध कार्यात सहभागी होऊन गावाच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घेत असतात.  याच कार्याचा भाग म्हणून या कार्यकर्त्यांनी श्री गणेश विसर्जनावेळी भक्तांकडून आणलेले निर्माल्य भल्या मोठ्या कलशात जमा करून निसर्गामध्ये विलीन केले जाते. तसेच गावातील आगरी आणि देशमुख तसेच इतर समाजातील गणपती हे एकत्रितरित्या विसर्जित करण्यासाठी गावातील तलावावर वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात सामूहिकपणे आणले जातात त्यानंतर सामूहिक श्री गणेश प्रार्थना , वंदना व आरती करून श्री गणेशाचे मनोभावे विसर्जन केले जाते. 

श्री शांतादेवी मित्र मंडळाच्या या सहकार्यामुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे . 

Comments

Popular posts from this blog