आवाज कोकणचा नवी मुंबई 

प्रतिनिधी उरण

पत्रकार उत्कर्ष समिती उरण  कार्यालयाचे उद्घाटन...



पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या संघटनेच्या उरण  कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोहळा 23/ 9/ 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील व संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

पत्रकार उत्कर्ष समिती ही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कार्यरत असून पत्रकारांचे हक्क व न्याय तसेच सामाजिक भान ठेवून सामाजिक हितासाठी लढणारी नोंदीकृत संस्था असून अनेक सामाजिक व आरोग्यदायी योजनांचे सफल आयोजन आयोजन आजपर्यंत करण्यात आले आहे.

या संस्थेच्या उद्घाटनाच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील आपल्या भाषणात म्हणाले की पत्रकार उत्कर्ष समिती उरण तालुका अध्यक्षपदी  पूजा चव्हाण याची झालेली निवड ही योग्य असून विभागातील पत्रकारांना त्यांच्या सहकार्याने अधिक फायदा मिळेल. अध्यक्ष पद मिळाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी चागली कामे तिने केलेली आहेत अशीच तिने तिचे कामे करावी.



या उद्घाटनाच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष पूजा चव्हाण,  तृप्ती भोईर,  रणीता ठाकूर ,  सायली साळुंखे, विठ्ठल ममताबादे,  ज्योती म्हात्रे, जय शिवराय यु ट्यूब चैनल चे उपसंपादक संयोग चव्हाण  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog