आवाज कोकणचा / नवी मुंबई
उरण येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन....
प्रतिनिधी / उरण
दिनांक १३/०९/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उरण येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
पालक न्यायमुर्ती आर . आय . छागला व न्यायामुर्ती साठ्ये , प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणाली द्वारे लोकअदालतच्या आभासी उद्दघाटन समारंभासाठी एम. एस. काझी, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर उरण तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती,
एस.पी. वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर उरण व श्रीमती. जी. के. आर टंडन, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, क स्तर उरण तालुका वकील संघटना चे अध्यक्ष श्री व्ही एल पाटील न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार असे उपस्थित होते. सदर लोक अदालतीमध्ये दोन कक्ष ठेवण्यात आले होते पहिल्या कक्षावर एम एस काझी, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर उरण तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, उरण व ॲड केवल गावड पंच म्हणून कार्यस्त होते. तसेच दुस-या कक्षावर मा. एस.पी वानखडे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर उरण व ॲड अनुराग ठाकुर कार्यरत होते.
सदर लोकअदालती करीता ५५३४ प्रकरणे ठेवण्यात आली होती व त्यापैकी एकुण १७२४ प्रकरणे निकाली झाली. सदर प्रकरणांमध्ये २.३२.३३.६९१/- इतक्या रकमेची तडजोड झाली. प्रचंड संख्येमध्ये लोकानी हजर राहून लोकन्यायालय यशस्वीपणे पार पाडले,
Comments
Post a Comment