आवाज कोकणचा / नवी मुंबई

उरण इंदिरा गांधी रुग्णालयात दिव्यांगांची तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर सपन्न...


वार्ताहर - पुजा चव्हाण

दि. ०८/०९/२०२५ रोजी ग्रामीण रूग्णालय उरण या रूग्णालयात जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग व मा. मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर घेण्यात आले या शिबिरात डॉ. विजय मसकर(मानसोपचार तज्ञ), डॉ. मृणालीली कदम (अस्थिव्यंग तज्ञ ), डॉ. पवन महाजन (नेत्ररोग तज्ञ), डॉ. बाबासो काळेल (वैद्यकीय अधीक्षक) ग्रामीण रुग्णालय उरण, श्री राजू ठाकूर सामाजिक कार्यकर्ते व उरण दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. महेंद्र म्हात्रे उपस्थीत होते.



या शिबिरात अस्थिरोग तपासणी, नेत्र तपासणी, मानसिक आजाराची तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये एकूण ११० दिव्यांग लाभार्थीनीं नोंद केली व त्यातील पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून तपासणी करून व कागदपत्राची पडताळणी करून दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या शिबिरामध्ये दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.


हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. बाबासो काळेल (वैद्यकीय अधीक्षक) तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत केली. तसेच उरण तालुक्यातील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य या शिबिरासाठी लाभले.



Comments

Popular posts from this blog