आवाज कोकणचा - नवी मुंबई
उरण / पूजा चव्हाण
पोलारीस लॉजिस्टिक पार्क भेंडखळ येथे कलमाच्या टायर खाली चिरडून ट्रकड्रायव्हरचा अपघात की घातपात ?
वार्ताहर पूजा चव्हाण
दिनांक 9/10/2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या च्या सुमारास पोलारीस सीएफएस भेंडखळ येथे कलमारच्या टायर खाली येऊन ट्रॅक ड्रायव्हर सैफुल्लाहा अमिरुल्लाहा खान वय वर्ष31,राहणार ग्राम नदवलीया अंतरी, सिद्धार्थनगर,जी. राज्य उत्तर प्रदेश याचा कलमारच्या मागच्या चकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
सैफुल्लाहा खान हा आपल्या ट्रॅकवरील काम संपवून कालमारच्या खाली उतरून उभा आसता कालमारचा चालक दुर्ग विजय कानोजिया राहणार जासई याने त्याच्या ताब्यातील कालमार 45 T क्र.H11601227 बेभानपणे रस्त्याच्या सभोतालच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करीत केवळ हलगर्जी पणाने व अविचाराने कालमार चालवून सैफुल्लाहा खान याला गाडीच्या मागच्या चाकाखाली चिरडले. या मध्ये सैफुल्लाहा खान याचा चिरडून जागीच मूत्यू झाला. या अपघातने पोलारीस सीएफएस मध्ये एकच खळबळ उडाली.असून येथील कामगारात हा घातपात की अपघात या बाबत चर्चेला उधाण आले आहे.
या संदर्भात पोलारीस अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, उरण पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद अपमृत्यू नोंद क्रमांक 279/2025 असून भा.द.वि. कलम 304 (अ) 279 अन्वये दिनांक 9/10/2025 रोजी 3 वाजता दाखल करण्यात आली आहे. या घटनेची खबर फिर्यादी रामानुजन रामखिलावन यांनी उरण पोलीस ठाण्यात दिली असता खबर मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण हनीफ मुलाणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड व गुन्हे प्रकटीकरण पथक बिटउरण पोलीस ठाणे व बीट मार्शल दोन वरील अंमलदार यांनी जातीने घटनास्थळी 4 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यानभेट दिली. या अपघाताचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे हे अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment