आवाज कोकणचा /  नवी मुंबई


प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मोबाईलचा वापर टाळण्याबाबत पत्रकार उत्कर्ष समितीची शालेय शिक्षण मुख्य सचिवांकडे मागणी... 

पनवेल  / प्रतिनिधी 



पत्रकार उत्कर्ष समिती या पत्रकारांच्या राज्यस्तरीय संघटनेचें अध्यक्ष डॉ. अशोक ल. म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार श्री. शैलेश ठाकूर यांनी राज्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मोबाईलचा वापर न करण्याबाबतची मागणी महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव श्री रणजीत सिंह देओल यांच्याकडे केली आहे .

कोविड या महाभयंकर जागतिक महामारीनंतर राज्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरळीत सुरू राहण्याकरता व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या चांगल्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास घेण्याचा मार्ग निवडला . त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून फायदा मिळाला परंतु कोविड ही महामारी संपल्यानंतरही अभ्यासासाठी मोबाईल वापरण्याच्या निर्णयावर कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळे शाळा प्रशासन गृहपाठ व इतर अनेक अभ्यास पूरक निर्णय मोबाईलच्या माध्यमातून पालकांकडे पाठवून देत असतात .

परिणामी मोबाईल वापरण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला व अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेल्याचे सध्या दिसून येत आहे. मोबाईलच्या या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व विशेषतः डोळ्यांवर घातक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे .

 अनेक विद्यार्थ्यांना लहान वयातच चष्मा लागल्याचे तसेच मोबाईलच्या अती आहारी गेल्यामुळे त्यांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होऊन अनेक विद्यार्थी हेकेखोर झाल्याचे व पालकांचे म्हणणे ऐकत नसल्याचे तसेच अनेक विद्यार्थ्यांमध्ये एकलकोंडेपणा आल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळत आहे.

देशाचा भावी नागरिक सुदृढ, सुशिक्षित व सक्षम होण्याकरता आणि त्यांच्यात जमिनी स्तरावरचे कौशल्य वाढीस लावण्याकरिता या पिढीच्या सर्वांगीण विकासात अडथळा ठरणाऱ्या मोबाईलचा कमीत कमी वापर व्हावा याकरिता पत्रकार उत्कर्ष समितीने ही मागणी केली आहे. 




Comments

Popular posts from this blog