आवाज कोकणचा / नवी मुंबई
पनवेल / प्रतिनिधि
पत्रकार उत्कर्ष समिती व महिला उत्कर्ष समिती तर्फे आदिवासी चिमुकल्यांना फराळ वाटप करून दिवाळी साजरी...
पत्रकार उत्कर्ष समिती व अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय समितीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व उरण सदस्य विशाल डाके, , आनंद महतो यांनी पनवेल तालुक्यातील खणावले आदिवासी वाडी येथील चिमुकल्यांना दिवाळी सणाच्या निमित्ताने फराळ वाटप केले.
दिवाळी हा सण सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. देशात मोठ्या प्रमाणावर विकास होत असला तरी अद्यापही शहरी, ग्रामीण व अती दुर्गम ग्रामीण अशा पद्धतीने दरी दिसून येते.
त्यामुळे अती दुर्गम ग्रामीण विभागात त्या प्रमाणात विकास दिसून येत नाही. परिनामी सणाचे महत्त्व मोठे असले तरीही आर्थिकदृष्ट्या विकास न झाल्यामुळे येथे विकास दिसून येत नाही.
समितीमार्फत या विभागातील शाळेत या अगोदरही शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम राबविले आहेत.
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा या उक्तीला अनुसरून डॉ. म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येथील चिमुकल्यांना दिवाळी फराळ वाटप करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. हाती फराळ पडताच या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव शब्दात व्यक्त न करता येण्यासारखे होते.
Comments
Post a Comment