आवाज कोकणचा / नवी मुंबई

पत्रकार उत्कर्ष समिती व दैनिक युवक आधार च्या वतीने उरण शहरात अनोखा उपक्रम...


पूजा चव्हाण / उरण 

सण-व्रत-वैकल्य याची परंपरा असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृती मध्ये वर्षाचे बाराही महिने सण असतोच, आपण सारेजण तो साजरा करण्यात गुंग असतो परंतु आपण साजरा करत असताना कळत नकळत समाज्यांतील खरे सेवक हे आपले सण आपल्याला आनंदाने साजरे करता यावेत यासाठी स्वतः सण साजरे न करता आपल्या कर्तव्याची अंमल बजावणी करण्यासाठी तत्पर असतात परंतु आपल्या पासून दुर्लक्षित राहतात.


 आपल्या कर्तव्याची अंमल बजावणी हाच त्यांचा खरा सण असतो त्यांच्या या कर्तव्यदक्ष सेवेची दखल घेत पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ . अशोक म्हात्रे यांच्या सामाजिक सेवेचा वसा अंगिकारत  पत्रकार उत्कर्ष समिती उरणच्या अध्यक्षा पूजा चव्हाण व पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्या तथा दैनिक युवक आधारच्या उरण कार्यालय प्रमुख सायली साळुंके यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शहरातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी झटणारे आसपासच्या परिसरातील सफाई कामगार व दिवाळी सणात आपल्या गावोगावी राहणाऱ्या परिवारात जाऊन आपल्याला सण साजरे करता यावेत यासाठी सुखरूप आणि वेळेवर पोहचविण्या साठी स्वतः आपल्या परिवारापासून लांब राहून कर्तव्यावर हजर असणारे राज्य परिवहन मंडळाचे वाहक व चालक यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन गुलाबपुष्प व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला.



या उपक्रमातून दिवाळी सणाचा आनंद समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे पूजा चव्हाण म्हणाल्या. या त्यांच्या सामाजिक संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या अशा कृतीतून प्रेरणा घेऊन दिवाळी सणाच्या या आनंददायी उपक्रमात सहभागी होण्याचा संकल्प उरण मधील अनेक नागरिकांनी या वेळी व्यक्त केला आहे.

 शहरातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या साफसफाई कर्मचाऱ्यांना आणि बस वाहक व चालकांना भेटून त्यांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या. वा छोट्या पण हृदयस्पर्शी कृतीमुळे समस्त कर्मचार्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.



यावेळी कर्मचायाँनी या अनोख्या उपक्रमाचे स्वगत केले आणि उरण मध्ये प्रथमच आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांची कुणीतरी दखल घेतली याचा आनंद व्यक्त करीत पत्रकार उत्कर्ष समिती उरणच्या अध्यक्षा पूजा चव्हाण व पत्रकार उत्कर्ष समितीच्या सदस्या तथा दैनिक युवक आधारच्या उरण कार्यालय प्रमुख सायली साळुंके यांचे आभारव्यक्त केले. "आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रकाश, आणि तो फक्त घरात नव्हे तर प्रत्येकाच्या मनातही उजळायला हवा. "अशी प्रतिक्रिया उरणच्या नागरिकांनी व्यक्त करून यापुढे या सामाजिक संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करीत अनेकांनी अशा कृतीतून प्रेरणा घेऊन दिवाळी सणाच्या या आनंददायी उपक्रमात सहभागी होण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.







Comments

Popular posts from this blog