आवाज कोकणचा / नवी मुंबई
वाहतूक शाखा न्हावा-शेवाच्या वतीने वीर वाजेकर विद्यालय वाहतूक नियमांचे प्रबोधन
पूजा चव्हाण :
आयसीआयसीआय लोम्बार्ड इंन्सूरन्स व सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने दीपावली सणाचे औचित्य साधून दीपावलीच्या पूर्व संध्येला वीर वाजेकर विद्यालय, फुंडे येथे वाहतूक नियमांचे प्रबोधन व हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व शिक्षकवृंद, शालेय शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वाना वाहन चालवविण्याचे नियंम, वाहन चालवीत असताना मोबाईलवर बोलू नये,
सिग्नल जंप करू नये तसेच रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम याबाबत नाव्हा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम मुजावर, वीर वाजेकर हायस्कूलव ज्युनिअर कॉलेज फुंडेचे प्राध्यापक श्री. साळुंखे सर व आयसीआयसीआय लोम्बार्ड इंन्सूरन्सच्या वतीने विनय बर्वे या सर्वांनी मार्गदर्शन केले. शेवटी आयसीआयसीआय लोम्बार्ड इंन्सूरन्स व सहयोगफाउंडशन यांच्या संयुक्तविद्यमाने वीर वाजेकर विद्यालय, फुंडे येथे विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटण्यात आले याचा लाभ विर वाजेकर विद्यालयाचे ६० ते ७० विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग. यांनी घेतला.
Comments
Post a Comment