आवाज कोकणचा नवी मुंबई 

वीर वाजेकर महाविद्यालयात CMLT अभ्यासक्रमाचे उद्घाटन....

पूजा चव्हाण ( उरण )

वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागात मेडिकल लॅबोरेटरी टेक्निक (CMLT) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जेएनपीए हॉस्पिटल, न्हावा शेवा येथील डॉ. वर्षा यादव यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.



कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व व्यवस्थापक उपप्राचार्य : श्री. गजानन चव्हाण (अध्यक्ष)कार्यवाह प्राचार्य : डॉ. आमोद ठक्कर (प्रेरणा व मार्गदर्शन)

आयक्यूएसी समन्वयक : डॉ. राहुल पाटील (समन्वयन)समन्वयक* : डॉ. श्रेया पाटील (CMLT अभ्यासक्रम) उपस्थित होते.


CMLT प्रमाणपत्र अभ्यासक्रम बी.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला असून, प्रयोगशाळेतील मूलभूत तंत्रज्ञान व पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांची प्रत्यक्ष हाताळणी शिकवली जाईल. कौशल्यवृद्धी व रोजगाराभिमुखतेसाठी उपयुक्त ठरणारा हा अभ्यासक्रम अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा, अशी या अभ्यासाची माहिती देण्यात आली असे आवाहन करण्यात आले.



या वेळी या उद्घाटन समारंभाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व अभ्यागत उपस्थित होते.

Comments

Popular Posts