महिला उत्कर्ष समिती तर्फे विजय आर्मी स्कूल पनवेल येथे तिळगुळ वाटप....
रायगड जिल्हा उपाध्यक्ष करूणा पाटील यांचा सहकाऱ्यांसह पुढाकार...
पत्रकार उत्कर्ष समिती प्रदेश अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष करूणा पाटील यांच्या सह इतर सहकाऱ्यांनी विजय आर्मी स्कूल पनवेल येथे भारतीय संस्कृती व परंपरा यांचे द्योतक असलेला मकर संक्रांतीचा सण तिळाचा स्नेह व गुळाचा गोडवा यांचे प्रतीक असलेला तिळगुळ सण साजरा केला.
विजय आर्मी स्कूल येथे देशाचे भावी पिढीचे जवान घडविणारे मुख्याध्यापक श्री आर डी पाटील , सैनिक निर्देशक श्री सुनील पाटील , श्री नितीन बोरसे , चंद्रकांत शिंदे , श्री किशोर बेहेरे व सागर भामरे, श्रीमती गाळवंट व श्रीमती सूर्यवंशी यांची मुख्य उपस्थिती होती.
समितीतर्फे कुलसुंभि शेख , सौ . ज्योती व सौ. कदम उपस्थित होत्या.




Comments
Post a Comment