उरण पोलीसांची मुस्कान मोहीम: भरकटलेल्या महिला व मुलाला केले घरच्यांच्या स्वाधीन...


 उरण प्रतिनिधी ( पूजा चव्हाण )

उरण, 23 जानेवारी 2026 - 

उरण पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार 1161/ पाटील यांनी ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत उरण बाजारपेठेत भरकटलेल्या महिला आणि मुलाला वाचवले. आशिया परवीन कलाम हुसेन (32) आणि त्यांचा मुलगा फैजान कलाम हुसेन (10) हे झारखंडच्या गिरीडी जिल्ह्यातील निवासी असून, कौटुंबिक वादातून घर सोडून बंगलोर जाण्यासाठी चुकीची ट्रेन पकडून उरण येथे आले होते.

पोलीसांनी सखोल चौकशी करून आशियाच्या पती कलाम हुसेन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आशियाचा भाऊ गया सुदिन आयूब अली अन्सारी उरण पोलीस स्टेशन येथे हजर झाला आणि त्यांना व सदर मिसिंग महिला व मुलगा यांना पोलीस निरीक्षक राहुल कटवानि (गुन्हे) यांचे समक्ष हजर करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर प्रकरणात पोलीस हवालदार 1161/ पाटील यांनी त्वरित कार्यवाही करून आशिया आणि त्यांच्या मुलाला सुरक्षित त्यांच्या परिवाराच्या ताब्यात दिले. या कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक राहुल कटवानि (गुन्हे) यांनी पोलीस हवालदार 1161/ सचिन पाटील यांचे शाबासकी दिली.

Comments

Popular Posts