आवाज कोकणचा / नवी मुंबई
उलवे पोलीस ठाणे आयोजित हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न....
उलवे / अशोक म्हात्रे
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत उलवे पोलीस ठाणे यांच्यातर्फे उलवे हद्दीतील महिलांसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन राजने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस कर्मचारी वृषाली मोकल व रोहिणी जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय संस्कृती व परंपरा याचे जतन व्हावे व भावी पिढीला ते माहीत व्हावे
तसेच बदलत्या काळात झालेले आधुनिकीकरण आणि गुन्हेगारीचे बदलते स्वरूप याबाबत विभागातील महिलांना त्याची माहिती मिळावी तसेच सुरक्षा करण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग याविषयी माहिती देण्यासाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी जवळपास शंभरहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दाखवली आणि हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. पोलीस आणि सामान्य जनता यांच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम उपयुक्त ठरत असून उलवे पोलीस ठाण्याच्या या कार्यक्रमाबद्दल जनमानसात चांगले मत तयार होत असून पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .






Comments
Post a Comment