उरणमध्ये गुरे चोरण्यासाठी आलेली टोळी रहस्यमयरित्या जेरबंद
उमेश कोळी यांनी केलेल्या धाडसाचे तालुक्यात कौतुक....
उरण प्रतिनिधी/पूजा चव्हाण
उरण मुळेखंड मध्ये गुरे चोरणाऱ्या टोळीला आपला जीव धोक्यात घालून एका गाईचे वासरू वाचविण्यात उरण मुळेखंड येथील रहिवासी उमेश महादेव कोळी यांना यश आले असून त्यामुळे गाई-गुरे चोरणाऱ्या टोळीचा परदापाश झाला असून गुरे चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे. उमेश कोळीयांनी केलेल्या धाडसाचे तालुक्यात कौतुक होत आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असेकी उरण मुळेखंड येथील रहिवासी उमेश महादेव कोळी हे व्यवसायाने शेतकरी असून जोडव्यवसाय म्हणून मच्छीमारी व ओला कार चालवितात.तर ब्रासबँडमास्तर म्हणून श्रीराम ब्रासबँड पथकात काम कारतात. दि.24 जानेवारी रोजी दुपारी पागोटे गावात ब्रासबँड वाजविण्या करिता गेले असता आपले ब्रासबँडचे कामकाज आटोपून दि.25 जानेवारी 2026 रोजीपहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या गाडीमधून नवीन शेव मार्गे मुलेखंड येथील आपल्या निवास स्थानी जात असताना मुलेखंड गावाच्या पाठीमागील खाडीकिनारी लाल रंगाची स्कॉर्पिओ क्र.KL01/ AK-4609 ही गडी संशइत रित्या उभी असलेली उमेश कोळीयांनी पहिली त्यागडीत 6 इसम संशइतरित्या बसलेले पाहूनत्यांच्या बाजूला गाईचे वासरू तोंडबांधलेल्या स्थितीत आढळून आले.
घटनेचे गांभीर्य जाणून उमेश कोळी यांनी त्या इसमांना याबाबत जाब विचारताच गाडींतील इसमांनी उमेश कोळी यान जबर मारहाण केली प्रसंगअवधान राखीत कोळी यांनी मोबिलफोन वरून गवात संपर्क साधला तोपर्यंत 6 इसमांनी कोळी यांना गाडीत टाकून पोबारा केला मात्र चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यांतील एक इसम फरार झाला,गावकऱ्यांनी गाईच्या वासरा सह 5 व्यतीना ताब्यात घेतले.त्यंच्या चर्चेवरून गाईचे वासरू कत्तलीसाठी पकडण्यात आल्याचे समजते खबर मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
कादेशीर कारवाई करतया गुन्ह्याच्या संदर्भात1)नूर मोहमद इसार कच्छी (26), कच्छीमोहला,मुसलमाननाका,जुने पनवेल,ता.-राअधिकयगड,२) मेहमूद पाशा शेख(22) कच्छीमोहला,मुसलमाननाका,जुने पनवेल,ता.-रायगड, 3) सलमान रिझवान कुरेशी(20) रा.निजामपूर,ता.भिवंडी,जि.ठाणे,4) मोहसीन अल्ली हसन कुरेशी,(30), रा.निजामपूर,ता.भिवंडी,जि.ठाणे ,5) दानिश इशार्द कुरेशी (28).गैभी नगर,शांतीनगर,भिवंडी,जि.ठाणे.6)पळून गेलेला इसम कारचालक,असिफ कुरेशी(30),आशा6 जणान पैकी 5 व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उरण पोलीस या घटने बाबत अधिक तपास करीत आहेत.




Comments
Post a Comment