आवाज कोकणचा / नवी मुंबई
जसखार ग्रामपंचायत उपसरपंचपदी सचिन घरत यांची बिनविरोध निवड...
पूजा चव्हाण
उरण, 13 फेब्रुवारी - उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवा सामाजिक संस्थेचे सचिन हरिश्चंद्र घरत यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवडणूक 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता झालेल्या ग्रामपंचायत बैठकीत पार पडली. या बैठकीत सचिन घरत यांची बिनविरोध निवड झाली.
या नंतर सचिन घरत यांच्या निवडीबद्दल युवा सामाजिक संस्था आणि जसखार यांच्या माध्यमातून उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सचिन घरत यांची बिनविरोध निवड झाल्याने युवा सामाजिक संस्थेच्या समर्थकांनी फाटक्याच्या आतिश बाजी करत जलोष केला.या वेळी ग्रामपंचायत सदस्या हेमालता ठाकूर, सीमा ठाकूर, धनवंती ठाकूर, वैजयंती ठाकूर, दमयंती म्हात्रे, सदस्य श्री राकेश तांडेल, शिवसेना तालूका प्रमुख दिपक ठाकूर, गणेश घरत, सुरेश म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, मा. सरपंच नितीन पाटील, निशांत ठाकूर, गिरीश मोकल, मयूर तांडेल, रितेश म्हात्रे, गणेश ठाकूर, चंद्रकांत घरत, आतिष घरत, मनीष मढवी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





Comments
Post a Comment