आवाज कोकणचा / नवी मुंबई

उरणमध्ये सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधेचा शुभारंभ...



पूजा चव्हाण 

नवी मुंबई : उरण तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या वतीने सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.



मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या वतीने उरणमधील पालवी हॉस्पिटलमध्ये सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मूत्रविकार, मूत्रपिंड, हृदयविकार, पोटविकार, ऑर्थोपेडिक्स व स्पाइन सर्जरी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे.


*डॉक्टरांची वेळ आणि दिनांक*


- नेफ्रॉलॉजी उपचारांसाठी इंटरव्हेन्शनल नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमर कुलकर्णी - दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी दुपारी १२ ते २

- ऑर्थोपेडिक्स व स्पाइन सर्जन डॉ. अरविंद जे. वाटकर - महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दुपारी २ ते ४

- ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, स्पोर्ट्स इंज्युरी आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रवण कुमार पवार - दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी २ ते ४

- युरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे - दर महिन्याच्या बुधवारी दुपारी १२ ते २

- रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रमोद भोर - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी २ ते ४

- हृदयविकार तज्ज्ञ डॉ. तामरीउद्दीन धनावडे - दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी दुपारी १२ ते २

- पोटविकार तज्ज्ञ डॉ. रावसाहेब राठोड - दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दुपारी १२ ते २


ही वैद्यकीय सेवा पालवी हॉस्पिटलमध्ये दुपारी १२.०० ते २.०० व दुपारी २ ते ४ या वेळेत उपलब्ध होणार आहे. याकरिता पुर्व नोंदणी आवश्यक असून गरजूंनी ८६५५८४५८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular Posts