आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्राचीन अमृतेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव भक्तिभावाने साजरा... 

अशोक म्हात्रे / बेलापूर 


आग्रोली -  बेलापूर ,


नवी मुंबई येथील प्राचीन अमृतेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. 

एक गाव एक गणपती अशी ख्याती असलेल्या या गावातील समाजासेवक श्री. गजानन पाटील व त्यांच्या कुटुंबाचे या सोहळ्यासाठी मोठे योगदान असते. भक्तीतून परमार्थ साधण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त या वेळी उपस्थित राहून शिवदर्शनाचा लाभ घेतात.

 पूर्णपणे भक्तिमय झालेल्या या सोहळ्याप्रसंगी भजन, कीर्तन व नामस्मरण अशा विविध माध्यमातून शिवनामाचा गजर चालू होता. 



यावेळी महिला उत्कर्ष समिती प्रदेश अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील यांच्यासह नवी मुंबई उपाध्यक्ष विजया निमसे, ऐरोली अध्यक्ष मानसी धनावडे, संगीता साबळे , सृष्टी साबळे, योगिता बोरसे काजल साळवे यांनी शिवदर्शनाचा लाभ घेत महाशिरात्री सोहळ्यात आपली उपस्थिती लावली. 


Comments

Popular Posts