आवाज कोकणचा / नवी मुंबई 

ओएनजीसीचा प्रकल्प गुजरातला नेण्याचा घाट, ६०० कामगार बेरोजगार होणार...

उरण  - पूजा चव्हाण

उरण, 18 फेब्रुवारी - ओएनजीसीचा न्हावा येथील सप्लाय बेस प्लांट गुजरातमधील पिपावाव येथे हलविण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या आरोप कामगारांकडून करण्यात येत आहे. यामुळे ६०० कामगार बेरोजगार होणार आहेत. याविरोधात संतप्त कामगारांनी मंगळवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर विरोध, निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली.



ओएनजीसीच्या नियोजन आणि परिवर्तन विभागाचे अध्यक्ष अजय कुमार सिंह यांनी तसे निर्देश दिले आहेत. कामगारांच्या वतीने ट्रान्सपोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव व्यंकटेश स्वामी यांनी प्रशासनाला कामगारांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. कामगारांना नोकरीची हमी द्यावी आणि नोकरीवर गदा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

ओएनजीसीच्या या प्रकल्पातून १००-१२५ किमी सागरी अंतरावर असलेल्या ओएनजीसीच्या तेल, गॅस विहीरीच्या 'मुंबई हाय' पर्यंत अवजड मशिनरी, पाइप, सिमेंट आदी विविध मालाची जहाजातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते.

Comments

Popular Posts