आवाज कोकणचा / नवी मुंबई


उलवे मध्ये माफक दरात सर्वसामान्यांसाठी  दर्जेदार वस्तू  उपलब्ध....

उलवे / अशोक म्हात्रे

विनोद कोळी आणि सहकाऱ्यांचा स्तुत्य उपक्रम. 

   


      उलवे येथील समाजबांधवांना कमी दरात दर्जेदार व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आगरी कोळी उद्योग समूहाने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने लांगेश्वर मंदिर, मोरावे, उलवे नोड येथे समूहाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीदरम्यान समूहाचे सहकारी विजय पाटील यांनी सर्व नामांकित कंपनींच्या खाद्यतेलांची डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्याची माहिती दिली. तसेच हितेश मढवी यांनी विकसित केलेले 'एके' ब्रँडचे परफ्युम बाजारात आणण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.



Comments

Popular Posts