आवाज कोकणचा / पुणे
किड्स फर्स्ट स्टेप प्रि स्कुल" चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न....
राजेंद्र जोशी. - पुणे
नऱ्हे श्री कंट्रोल चौक येथील सुप्रसिद्ध केजी स्कूल चे संस्थापक प्रो प्रकाश देंडगे आणि प्रिन्सिपॉल प्रो सोनाली प्रकाश देंडगे यांच्या "किड्स फर्स्ट स्टेप प्रि स्कुल" चे वार्षिक स्नेह संमेलन काल रविवारी सायंकाळी 4 वाजता शिवपार्वती मंगल कार्यालय जे एस पी एम कॉलेज रोड नऱ्हे पुणे-41 येथे मोठ्या थाटामाटात, जल्लोषात साजरे झाले. शाळेचे डायरेक्टर प्रो प्रकाश दत्तात्रय देंडगे व प्रिन्सिपॉल प्रो सोनाली प्रकाश देंडगे यांनी आपल्या जन्मदात्या आई सौ सुनिता दत्तात्रय देंडगे यांची कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभ आशीर्वाद घेतला. या प्रसंगी त्यांच्या मातोश्री यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
प्रा श्री राजेंद्र जोशी सर यांच्या वतीने विशेष निमंत्रित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून विजयी नगरसेविका आणि नऱ्हे गावच्या माजी आदर्श सरपंच सौ जयश्री ताई भूमकर आणि त्यांचे सुपुत्र व विद्यमान उप सरपंच सागर भुमकर हे उपस्थित होते, त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद देऊन ज्युनियर व सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले, संस्थापक, प्रिन्सिपॉल,शिक्षिकांचे आणि, पालकांचे आभार मानले आणि शाळेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सहकार्य करू असे आश्वासन दिले. प्रारंभी प्रो राजेंद्र जोशी सर,प्रो बबन शिंगाडे, प्रो सुनील पवार , प्रो प्रविण जावळे आणि प्रो प्रकाश देंडगे,अविनाश वाजे , प्रो सोनाली शेलार या सर्वांनी दीपप्रज्वलन करून सरस्वती आणि शिवाजी महाराज यांच्या मूर्तींना हार घालून पूजन केले.
सर्व शिक्षिका यांनी विशेष कष्ट घेऊन गाणी, अप्रतीम नृत्ये बसवली होती आणि सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रो सोनाली प्रकाश देंडगे यांनी व्यक्त केले.





Comments
Post a Comment