उरणमध्ये कॉंग्रेसचा दणदणीत विजय!



पूजा चव्हाण 

उरण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या कॉंग्रेसने दोन जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या होत्या. त्या दोन्ही जिंकून कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी करिष्मा केला आहे.

जासई जिल्हा परिषदेच्या गटातून डॉ. मनीष पाटील आणि चिरनेरमधून ऍड. अविनाश ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी विजयोत्सव साजरा केला.



महेंद्रशेठ घरत म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून आलेत. रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. आज बॅरिस्टर अ. र. अंतुले साहेब यांची जयंती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने मारलेली बाजी कौतुकास्पद आहे."

अंतुले साहेब आणि दि. बा. पाटील साहेब यांना महाविकास आघाडीचा विजय समर्पित करत आहोत.



Comments

Popular Posts