आवाज कोकणचा / नवी मुंबई 

उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी महेश म्हात्रे आणि उपसभापतीपदी परेश ठाकूर...


पूजा चव्हाण -   उरण 

उरण, ११ मार्च - उरण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड बुधवारी (दि.११) उरण पंचायत समितीच्या कार्यालयात पीठासन अधिकारी अधिकारी तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महाविकास आघाडीच्या शेतकरी कामगार पक्षाचे महेश म्हात्रे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापती महाविकास आघाडीचे शिवसेनेचे परेश ठाकूर यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.



महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या दोन्ही सदस्यांची सभापतीपदी व उपसभापती पदी निवड झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित सभापती महेश म्हात्रे व उपसभापती परेश ठाकूर यांना शुभेच्छा देण्यासाठी, शेकापाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, जिल्हा परिषद सदस्य अविनाश ठाकूर , माजी पंचायत समिती सभापती नितीन कोळी, शेकापचे नरेश घरत, माजी उपसभापती रमाकांत पाटील, शेकाप तालुका चिटणीस रवी घरत,शेकापचे सहचिटणीस सुरेश पाटील, जिल्हा चिटणीस सदस्य संजय गावंड, शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उपतालुकाप्रमुख बी एन डाकी, नगरसेविका निहादा ठाकूर, लता पाटील, शेखर पाटील, शुभांगी पाटील, तुळशीदास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जल्लोष करत मोठ्या उत्साहात उरण शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी करत नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतीचे अभिनंदन केले.



"उरण पंचायत समितीच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत," असे नवनिर्वाचित सभापती महेश म्हात्रे यांनी म्हटले. "आम्ही उरणच्या जनता-जनार्दनाच्या विश्वासाला जागणार आहोत," असे उपसभापती परेश ठाकूर यांनी म्हटले.

उरण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही सदस्यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.



Comments

Popular Posts