आवाज कोकणचा /  नवी मुंबई

 महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई तर्फे ज्ञान ज्योतींचा सन्मान करून महिला दिन उत्साहात संपन्न ...


नवी मुंबई उपाध्यक्ष सौ विजया निमसे व ऐरोली विभाग अध्यक्ष सौ. मानसी धनावडे यांचे मोलाचे योगदान 

पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्ष सौ. विजया निमसे यांनी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सहकारी ऐरोली विभाग अध्यक्ष सौ. मानसी धनावडे, डॉ. जयश्री फडतरे , सौ. यामिनी बोरसे, सौ. संगीता साबळे सौ. अलका पाटील, सौ. सविता कवठेकर, सौ. काजल साळवी, सौ. स्वाती बनकर ,तुर्भे विभाग अध्यक्ष सौ वंदना अंबावले , तुर्भे विभाग उपाध्यक्ष सौ. राणी दळवी यांच्या सहकार्याने नवी मुंबई मधील घणसोली येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 42 येथील शिक्षिका , बालवाडी शिक्षिका तसेच महिला सफाई कर्मचारी यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सन्मानित केले. 


 या शानदार कार्यक्रमात वरील शाळेच्या जवळपास 60 हून अधिक महिला शिक्षकांचा प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व गोड चॉकलेट देऊन सन्मान केला. 

शाळेच्या मुख्याध्यापिका तथा घणसोली केंद्र समन्वयक सौ अर्चना म्हात्रे, संस्कृती प्रबोधिनी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रभाकर डहाके, सकाळ सत्र प्रमुख श्री. उल्हास पुरव, दुपार सत्रप्रमुख सौ . संध्या पाटील, दुपार (डी मार्ट) सत्र प्रमुख सौ मधुरा शेडगे, श्री ज्ञानेश्वर जाधव सकाळ (डी मार्ट) सत्र प्रमुख, श्री आत्माराम आग्रे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना सरचिटणीस , श्री बबन दरेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना खजिनदार सौ. समिक्षा लोट , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना महिला संघटक यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती. 


 पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी या ज्ञानज्योतींच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की या कर्मठ शिक्षकांमुळेच, आपली संस्कृती व परंपरा टिकून राहण्यास तसेच सुजाण, सुसंस्कृत , देशभक्त नागरिक तयार होण्यासाठी या जिजाऊ, अहिल्या च्या लेकी अखंड परिश्रम करत असतात 

शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना म्हात्रे यांनी महिला उत्कर्ष समितीच्या या कार्याबद्दल आभार व्यक्त करतानाच भविष्यात महिला उत्कर्ष समिती शाळेच्या विविध कार्यात सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.



Comments

Popular Posts