आवाज कोकणचा / रायगड
पेण येथील गायक श्री प्रमोद झाल्टे व गायिका ऋतुजा पार्टे या दोघांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलेंस इंग्लंड या विश्वविक्रमामध्ये नोंद ...
अमोल येरणकर - पेण
स्वामिनी म्युझिक व ॲक्टिंग अकॅडमी तर्फे प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी मॅडम पुणे यांनी 25 ऑक्टोबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील 115 गायकांना घेऊन नॉन स्टॉप 575 हिंदी व मराठी गाणी सलग 52 तास गाऊन वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स इंग्लंड या विश्वविक्रमामध्ये नोंद केली आहे
दिनांक 26 मार्च 2026 रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले त्यांच्या या कामगिरीबद्दल पेन तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून त्यांचे वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे




Comments
Post a Comment